१९६० साली आप्पानी दुधाच्या व्यवसायातून अपार कष्ट करून सीना नदीकाठी लांबोटी येथे शेत खरेदी केली. सुरुवातीला सोयाबीन व कांदा उत्पादन सुरु केली या व्यवसाया मध्ये त्यांना सीना नदी माई कृपेने खूप यश मिळाले. १९६५ साली आप्पानी लांबोटी येथे ५० म्हशी आणि १० गाईचा मोठा गोठा सुरुवात केली.
कुबेर अप्पाराव वाघमोडे व अभिमान अप्पाराव वाघमोडे यांनी १९९२ झोपडी वजा चिंचेच्या झाड खाली चहाचा व्यवसाय सुरुवात केली व पुढे काही कालांतराने नाश्ता व्यवसाय सुरुवात केली. त्यांनी ५ पत्र्याच्या शेड व झोपडी मधून व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. पुढे १९९९ साली ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे शेड मधून मोठ्या हॉटेलची उभारणी केली. त्याचे नाव हॉटेल सुनील या नावाने प्रसिद्ध झाली. येथील पुरी भाजी, मिसळ पाव, वडा पाव, मका (लांबोटी) चिवडा, सोलापुरी शेंगा चटणी, खवा आणि कुंदा मुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाली. कालांतराने , कारळ चटणी, लसूण चटणी, खोबरे चटणी, तीळ चटणी, जवस चटणी, कांदा लसूण तिकट व काळा मसाला यांचे दर्जेदार उत्पादन सुरु करण्यात आली. येथील गावरान शुद्ध तूप खूप प्रसिद्ध आहे. या तुपासाठी पुणे व मुंबई मधून खूप मागणी आहे. पुढे त्यांच्या मदतीसाठी चंद्रशेखर ,अनिल, श्रीनिवास, प्रेम यांनी मोलाची कामगिरी केली व तसेच सुनील वाघमोडे यांनी हॉटेल मैनेजमेंट करून लांबोटी येथे महत्वाचे बदल केले त्यामुळे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेतली.
२०१३ साली चिंचोलीकाठी येथे जागा विकत घेऊन भव्य आणि दिव्य सर्व सुखसोयींनी उपलब्ध असे हॉटेल सुनील ची दुसरी शाखा उभारण्यात आली. येथे नाश्ता विभागासहित जेवण विभाग सुद्धा सुरु करण्यात आले. येथील कुंदा चहा, पंजाबी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, आंध्र थाळी प्रमाणे पनीर अंगारा, मश्रुम कढई, पनीर टिक्का, सुनील स्पेशल व्हेज, व्हेज बिर्याणी, तिरंगा बिर्याणी खूप लोकप्रिय आहेत.
सोलापूर हे शहर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूर या महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांना जोडलेले केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरातून येणारे भाविक हॉटेल सुनील ला आवर्जून भेट देतात. त्यामुळे हॉटेल संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत प्रसिद्ध झाले.